Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या या गाडीच्या वेळेत झाला बदल
मुंबईच्या दिशेने धावताना मडगावची वेळ बदलली
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळूर सेंट्रल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन एक्सप्रेसच्या वेळेत किंचितसा बदल झाला आहे.
देशभरातील संपूर्ण रेल्वे झोन मध्ये फक्त कोकण रेल्वे मार्गावरच पावसाळ्यासाठी सुंदर वेळापत्रक
कोकणात मुसळधार कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या संभाव्य घटना, रेल्वे रुळांवर पाणी येणे अशा घटना लक्षात घेऊन देशभरात फक्त आणि फक्त कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 10 जून नंतर 31 ऑक्टोबरपर्यंत मानसून टाईम टेबल आखले जाते. या कालावधीत या मार्गे धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०) मडगाव जंक्शन वरील वेळेत बदल झाला आहे. आतापर्यंत ही गाडी मुंबईकडे जाताना सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी मडगाव स्थानकावर येऊन सात वाजून 35 मिनिटांनी सुटत होती. आता ती सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांऐवजी ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबईसाठी सुटणार आहे.