महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

Konkan Railway | गणपती स्पेशल गाड्यांचे असे आहे टाईम टेबल!

रत्नागिरी : येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने विशेष गाड्यांच्या एकूण २०२ फेऱ्या शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण दिनांक 21 जुलैपासून ऑनलाईन तसेच संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर सुरू होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या गाड्यांची तपशीलवार माहिती याप्रमाण

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनदिन विशेष (३६ फेऱ्या)

01151 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01152 विशेष दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज १५.१० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

संरचना: दोन वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान आणि २ गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास. (२० आईसीएफ)

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनदिन विशेष (३६ फेऱ्या)*

01153 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज ११.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

01154 विशेष रत्नागिरी येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज ०४.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: दोन वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास. (२० आईसीएफ)

३) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष (३६ फेऱ्या)

01167 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

01168 विशेष कुडाळ येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01168 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (फक्त 01168 अप साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (फक्त 01168 अप साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01168 अप साठी), कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना: दोन वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान आणि २ गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास. (२० आईसीएफ)

४) लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष (३६ फेऱ्या)

01171 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01172 विशेष सावंतवाडी रोड येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

संरचना: दोन वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान आणि २ गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास. (२० आईसीएफ)

५) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या)

01185 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार दि. ०२.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) दरम्यान ००.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

01186 विशेष कुडाळ येथून दि. ०२.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01186 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा (फक्त 01186 अप साठी), आरवली रोड (फक्त 01186 अप साठी), संगमेश्वर रोड, साठी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01186 अप साठी), कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना: दोन वातानुकूलित- तृतीय, १२ शयनायान आणि २ गार्ड्सच्या ब्रेक व्हॅनसह ६ जनरल सेकंड क्लास. (२० आईसीएफ)

६) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)

01165 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी दि. ०३.०९.२०२४, दि. १०.०९.२०२४ आणि दि. १७.०९.२०२४ (३ फेऱ्या) रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

01166 विशेष प्रत्येक मंगळवारी, दि. ०३.०९.२०२४, दि. १०.०९.२०२४ आणि दि. १७.०९.२०२४ (३ फेऱ्या) रोजी कुडाळ येथून १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01166 अप साठी), खेड, चिपळूण, सावर्डा (फक्त 01166 अप साठी), आरवली रोड (फक्त 01166 अप साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01166 अप साठी) कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना: एक वातानुकूलित-प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित-द्वितीय, 15 वातानुकूलित-तृतीय, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर कार (२२ एलएचबी)

७) दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैंनदिन अनारक्षित विशेष (३६ फेऱ्या)

01155 मेमू विशेष दिवा येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) ०७.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

01156 मेमू विशेष चिपळूण येथून दि. ०१.०९.२०२४ ते दि. १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: निलजे, तळोजा पंचानंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जीते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सप्पे वामणे, करंजाडी, विन्हेरे, देवाणखाऊ , कळंबणी, खेड आणि अंजनी.

संरचना: १२ कार मेमू रेक

*आरक्षण*: गणपती विशेष ट्रेन क्रमांक 01151, 01152, 01153, 01168, 01171, 01172, 01185, 01165 आणि 01166 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह
दिनांक *२१.०७.२०२४* पासून उघडले जाईल.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

ट्रेन क्र. 22119/22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाळी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 12229/12230 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत या गाड्यांचे बुकिंग, पावसाळ्यात वेळापत्रकात बदल झाल्यामुळे बंद करण्यात आले होते, ते दि. २१.०७.२०२४ पासून पुन्हा सुरू होईल.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button