Konkan Railway | छत्तीसगडमधून थेट कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी २० डिसेंबरपासून धावणार!
विलासपूर ते मडगाव मार्गावर विशेष फेरीचे नियोजन

- विलासपुर ते मडगाव मार्गावर विशेष फेरीचे नियोजन
- गोव्याला नाताळ नववर्ष स्वागत साठी जाणाऱ्या प्रवाशांची होणार सोय
रत्नागिरी : कोकण रेल्वे ( Konkan Railway) मार्गावर नाताळ (Christmas) आणि नवीन वर्षाच्या (New Year) सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) समन्वयाने आता बिलासपूर ( छत्तीसगड ) (Bilaspur) आणि मडगाव (Madgaon Jn.) दरम्यान विशेष ‘एक्सप्रेस स्पेशल’ ट्रेन चालवण्यात येणार आहे.
️ बिलासपूर-मडगाव एक्सप्रेस स्पेशल (08241/08242) – वेळापत्रक
ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन एकूण ८ फेऱ्यांमध्ये धावणार असून, मध्य भारत ते कोकण-गोवा असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
1. ट्रेन क्र. 08241 (बिलासपूर ते मडगाव जंक्शन)


मुख्य थांबे (महाराष्ट्र आणि कोकण भागातील)
या विशेष ट्रेनला प्रवासादरम्यान महाराष्ट्रातील आणि कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवाशांची खूप सोय होणार आहे.
- महाराष्ट्रातील थांबे: नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेन.
- कोकण रेल्वे मार्गावरील थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड.
- गोव्यातील थांबे: थिविम आणि करमळी.
- ट्रेन क्र. 08242 (मडगाव-बिलासपूर) या गाडीला वरील सर्व थांब्यांव्यतिरिक्त इगतपुरी (Igatpuri) स्टेशनवर देखील थांबा असेल.
- एसी २-टियर (AC 2 Tier): ०१ कोच
- एसी ३-टियर (AC 3 Tier): ०८ कोच
- एसी इकॉनॉमी (AC Economy): ०२ कोच
- स्लीपर क्लास (Sleeper Class): ०२ कोच
- जनरल सिटिंग (General): ०३ कोच
- एसएलआर/जनरेटर कार: ०२
- बुकिंग सुविधा: सर्व पीआरएस (PRS) काउंटर्सवर, इंटरनेटवर आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर (irctc.co.in) उपलब्ध आहे.





