Konkan Railway | तिरुअनंतपुरम ते दिल्ली वातानुकूलित विशेष ट्रेन!
हजरत निजामुद्दीन 'वन वे स्पेशल' कोकण रेल्वे मार्गावर रविवारी येणार

तिरुवनंतपुरम : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वे क्रमांक 06159 तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन वन वे स्पेशल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी ही मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. दिल्लीकडे जाणारी ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (14 डिसेंबर) धावणार आहे. रत्नागिरी स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी तर चिपळूण रेल्वे स्थानकावरती सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी येणार आहे.
गाडी क्रमांक 06159 वेळापत्रक आणि मार्ग
- प्रस्थान: गाडी क्रमांक 06159 तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन वन वे स्पेशल ही गाडी शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७:४५ वाजता सुटली आहे.
- आगमन: ही गाडी दुसऱ्या दिवशी १९:०० वाजता ह. निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे (मुख्य स्थानके)
ही विशेष रेल्वे खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:
- केरळ/कर्नाटक: कोल्लम जं., कायंकुलम, कोट्टायम, एर्नाकुलम टाऊन, थ्रिसूर, शोरानूर जं., कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळूर जं.
- कोकण मार्ग: उडुपी, कुंदापुरा, मूकंबिका रोड बायंदूर, कारवार, मडगाव जं., थिवीम, रत्नागिरी, चिपळूण,
- मध्य रेल्वे : रोहा, पनवेल, वसई रोड.
- पश्चिम/मध्य भारत: उधना जं., वडोदरा जं., रतलाम जं., कोटा, सवाई माधोपूर आणि मथुरा जं.
कोच संरचना (Composition)
या स्पेशल गाडीत एकूण २१ एलएचबी (LHB) डबे असतील:
- प्रथम श्रेणी वातानुकूलित (First AC) – ०१
- द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2 Tier AC) – ०५
- तृतीय श्रेणी वातानुकूलित (3 Tier AC) – १२
- पँट्री कार (Pantry Car) – ०१
- जनरेटर कार (Generator Car) – ०२
अधिक माहितीसाठी
या गाडीच्या थांब्यांच्या व वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) ताज्या अपडेट्ससाठी KR Mirror App डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.




