Konkan Railway | दिवाळीसाठी चिपळूण, मडगावसाठी विशेष ट्रेन धावणार!

रत्नागिरी : दिवाळी २०२५ (Diwali 2025) सणामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) दोन विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष गाडी क्र. १: ०१००४ / ०१००३ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (T) – मडगाव जं. साप्ताहिक स्पेशल. 5, 12 आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी

- थांबे: करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे.
- कोच रचना (LHB): एकूण २० डबे = २ टायर एसी – ०१, ३ टायर एसी – ०३, ३ टायर एसी इकोनॉमी – ०२, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
- आरक्षण (Booking) सुरू: गाडी क्र. ०१००४ साठी बुकिंग ०१/१०/२०२५ पासून सर्व पीआरएस (PRS) काउंटर्स, इंटरनेट आणि IRCTC च्या वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाडी क्र. २: ०११६० / ०११५९ चिपळूण – पनवेल – चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशल. ( 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आठवड्यातील दर शुक्रवार, शनिवार व रविवारी धावेल )

- थांबे: आंजणी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेन, जिते, आपटा आणि सोमतणे.
- कोच रचना: एकूण ०८ मेमू (MEMU) डबे.
प्रवाशांना आवाहन:
दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने ही चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेवर तिकीट बुकिंग करून या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गाड्यांच्या थांब्यांबद्दल आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.