महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

Konkan Railway | दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता तीन वातानुकलीत कोचसह धावणार!

  • कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मडगाव सावंतवाडी तसेच सावंतवाडी दिवा दोन रेल्वे एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासादरम्यान आसन उपलब्धता वाढेल आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.

कोणत्या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडले जाणार?

१. ट्रेन क्रमांक ५०१०८ / ५०१०७ मडगाव जंक्शन – सावंतवाडी रोड – मडगाव जंक्शन पॅसेंजर

  • सध्याची डबा रचना: २ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, १२ सामान्य डबे, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर (एकूण १६ एलएचबी डबे).
  • वाढवलेला डबा: १ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबा.
  • सुधारित डबा रचना: ३ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, १२ सामान्य डबे, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर (एकूण १७ एलएचबी डबे).
  • प्रारंभ तारीख: ट्रेन क्रमांक ५०१०८ मडगाव जंक्शनहून १५/०७/२०२५ पासून, तर ट्रेन क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोडहून १६/०७/२०२५ पासून या नवीन डबा रचनेसह धावतील.
  • २. ट्रेन क्रमांक १०१०६ / १०१०५ सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेस
  • या ट्रेनमध्येही कायमस्वरूपी अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. मडगाव येथून सावंतवाडीला आलेली गाडी पुढे सावंतवाडी ते दिवा अशी धावत असल्याने या दोन्ही गाड्यांची कोच रचना सारखी आहे
  • प्रारंभ तारीख: सुधारित कोच रचनेनुसार ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोडहून १५/०७/२०२५ पासून, तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा जंक्शनहून १६/०७/२०२५ पासून या नवीन डबा रचनेसह धावतील.
    प्रवाशांना विनंती:
    वरील गाड्यांचे विस्तृत थांबे आणि वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
  • या कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांमुळे गोवा आणि कोकण मार्गावरील प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button