Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला ११ फेऱ्यांमधून १ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस उत्पन्नाच्या बाबतीत रेल्वेसाठी फायदेशीर ठरु लागली आहे. दि. 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2023 अवघ्या 11 फेऱ्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसने १ कोटी ४८ लाख १६ हजार ३७८ रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरू होऊन या गाडीला अजून तीन महिने पूर्ण झालेली नाहीत. सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणारी ही गाडी १ नोव्हेंबर 2023 पासून आठवड्यातून सहा दिवस धावेल.
महाराष्ट्रातून सुरू होणाऱ्या आणि महाराष्ट्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या एकूण आठ एक्सप्रेस गाड्यांचे उत्पन्न हे रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरु लागले आहे.
मध्य रेल्वे क्षेत्रांतून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये प्रवासी व्याप्ती भार दर
कालावधी- १५.८.२०२३ ते ८.९.२०२३
-एकूण फेऱ्या- १५०.
- एकूण प्रवाशांनी प्रवास केला- १,२२,२२६ (१.२२ लाख).
-एकूण उत्पन्न- रु. १०,७२,२०,७१८/- (१०.७२ कोटी)
1) 20825 बिलासपूर- नागपूर वंदे भारत एक्सप्रेस-
प्रवासी व्याप्ती भार दर- १२२.५६%
फेऱ्या- २२
प्रवासी- १४,२९१
उत्पन्न- रु. १,०६,०४,५०२/-
2) 20826 नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस- प्रवासी व्याप्ती भार दर- १०६.४०%
फेऱ्या- २२
प्रवासी- १२,४०७
उत्पन्न- रु. ९९,४२,८६८/-
३) 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस -प्रवासी व्याप्ती भार दर- ८१.३३%
फेऱ्या- २१
प्रवासी- १९,२६७
उत्पन्न- रु. १,६६,५५,३२६/-
४) 22224 शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस-
प्रवासी व्याप्ती भार दर- ८१.८८%
फेऱ्या- २१
प्रवासी- १९,३९८
उत्पन्न – रु. १,८२,८१,०५१/-
५) 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस:
प्रवासी व्याप्ती भार दर- ९३.७१%
फेऱ्या- २१
प्रवासी- २२,२००
उत्पन्न – रु. १,७१,९२,१०२/-
6) 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस:
प्रवासी व्याप्ती भार दर- १०५.०९%
फेऱ्या- २१
प्रवासी- २४,८९४
उत्पन्न – रु. १,९७,२८,४९१/-
७) 22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोवा मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी व्याप्ती भार दर- ९२.०५%
फेऱ्या- ११
प्रवासी- ५,३६७
उत्पन्न- रु. ७६,११,६६२/-
८) 22230 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी व्याप्ती भार दर- ७५.५०%
फेऱ्या- ११
प्रवासी- ४,४०२
उत्पन्न – रु. ७२,०४,७१६/-
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गे धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव गोवा एक्स्प्रेस-सध्या मान्सून वेळापत्रकासह आठवड्यातून ३ वेळा चालविण्यात येत आहे. भाऊसाहेब वेळापत्रक संपल्यावर दिनांक १ नोव्हेंबरपासून ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे.