Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा उद्या सकाळी लोकार्पण सोहळा
रत्नागिरी : राज्य सरकारच्या निधीतून करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील सुशोभीकरण कामाचे लोकार्पण उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता हा सोहळा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खात्याने उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून स्थानकाचे असोशोभी करण्याचे काम मागील काही महिलांपासून सुरू होते.
लोकार्पण सोहळ्यासाठी ना. रविंद्र चव्हाण हे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 9 ऑक्टोबर रोजी रात्री 0.20 वा. पनवेल रेल्वेस्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेस ने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 6 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 6.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : रत्नागिरी रेल्वे स्थानक, रत्नागिरी.) सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने मोपा (गोवा) कडे प्रयाण.