Konkan Railway | लॉंग वीकेंड स्पेशल ट्रेनचे आरक्षण सुरू
रत्नागिरी : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाठोपाठ जोडून येणारे शनिवार-रविवार यामुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडी जाहीर केली आहे. या विशेष गाडीचे आरक्षण सोमवारी सकाळपासून सुरू झाले आहे.
जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01149/01150 या विशेष ट्रेन जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९ वाजता दिनांक 15 तसेच 17 ऑगस्ट 2024 रोजी विशेष गाडी सुटेल. ही गाडी मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मडगाव येथून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी 01155 ही गाडी दिनांक 16 व 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुटून (दुसऱ्या दिवशीच्या ) रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
- हे सुद्धा वाचा : Konkan Railway | गणपती स्पेशल गाड्यांचे असे आहे टाईम टेबल!
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
TOD विशेष गाडीचे थांबे
- ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे रोड, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी.
- गाडीला स्लीपर श्रेणीचे आठ तर जनरल श्रेणीतील तीन डब्यांसह वातानुकूलित डबे मिळून एकूण 21 डब्यांची ही एलएचबी प्रकारातील ट्रेन असेल.