Konkan Railway | एलटीटी-करमाळी ख्रिसमस विशेष २३ डिसेंबरपासून धावणार!

रत्नागिरी : ख्रिसमस आणि हिवाळी हंगामात २०२४-२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दिनांक 23 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत ही गाडी धावेल.
कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
गाडी क्र. ०११४९ / ०११५० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनंदिन) :
गाडी क्र. ०११४९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष (दैनंदिन) २३/१२/२०२४ ते ३१/१२/२०२४ दरम्यान दररोज लोकमान्य टिळक (टी) येथून १५:३० वाजता रवाना होईल. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्र. ०११५० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनंदिन) २४/१२/२०२४ ते ०१/०१/२०२५ दरम्यान दररोज करमाळी येथून सकाळी ६:४५ वाजता रवाना होईल. गाडी त्याच दिवशी रात्री २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
या स्थानकांवर थांबेल विशेष गाडी
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सांगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, काणकोण, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम स्टेशनवर थांबेल.
रचना : एकूण २२ एलएचबी कोच = संयुक्त (प्रथम एसी + दुसरा एसी) – ०१ कोच, दुसरा एसी – ०३ कोच, तिसरा एसी – १२ कोच, स्लीपर – ०२ कोच, जनरल – ०२, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.