Konkan Railway | मडगाव- पनवेल विशेष गाडी १५ सप्टेंबरला धावणार!
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे.
गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी विशेष गाडी (01428) सुटेल. पनवेलला ती रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01427) पनवेल येथून रात्री अकरा वाजून 45 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ती मडगाव ला पोहोचणार आहे.
विशेष गाडीचे थांबे
करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण.