Konkan Railway | रत्नागिरी -वैभववाडी दरम्यान २३ ऑगस्टला रेल्वेचा मेगाब्लॉक
- तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
- देखभाल दुरुस्तीसाठी साडेतीन तासांचा घेणार ब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 10:30 यावेळेत तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार्या मेगा ब्लॉकमुळे 11003 दादर -सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही दिनांक 23 ऑगस्ट रोजी प्रवास होणारी गाडी रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाणार आहे. याचबरोबर 16346 तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी जिचा प्रवास 22 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या असेल ती कोकण रेल्वे मार्गावरील उडुपी ते कणकवली दरम्यान सुमारे तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे. याचबरोबार सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन दरम्यान धावणारी 10106 या क्रमांकाची एक्सप्रेस गाडी जिचा प्रवास 23 रोजी सुरू होतो ती गाडी सावंतवाडी ते कणकवली दरम्यान अर्धा तास थांबवून ठेवली जाणार आहे.