MSRTC | उरण एसटी आगारातून गणेशोत्सवात कोकणसाठी जादा बसेसची व्यवस्था
- कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश
- सर्व बसेस ऑनलाईन बुकिंग द्वारे झाल्या हाऊसफुल
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : गणेशोत्सव काळात उरण आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे करण्यात आली होती. संस्थेच्या मागणीला महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दिवसा तसेच रातराणी गाड्यांची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून मुंबई सेंट्रलचे महा व्यवस्थापक (वाहतूक ) शिवाजी जगताप, उरण आगार प्रमुख सतीश मालचे यांनी जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
उरणमधून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक
- दिनांक ५/९/२०२४ रोजी उरण ते खेड, सुटण्याची वेळ सकाळी ७ वाजता.
- दिनांक ५/९/२०२४ रोजी उरण ते गुहागर, सकाळी ७:३० वाजता.
- दिनांक ५/९/२०२४ रोजी उरण ते दाभोळ बंदर, सकाळी ८ वाजता
- दिनांक ५/९/२०२४ रोजी उरण ते राजापूर रात्री ८ वाजता
- दिनांक ६/९/२०२४ रोजी उरण ते खेड सकाळी ७ वाजता
- दिनांक ६/९/२०२४ रोजी उरण ते गुहागर सकाळी ७:३० वाजता
या सर्व गाड्यांचे आरक्षण ऑनलाईन बुकिंगद्वारे फुल्ल झाले आहे. प्रवासी वर्गाचा चांगला, उत्तम प्रतिसाद यावेळी मिळाला आहे. महामंडळचे (वाहतूक ) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे, उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे, वाहतूक निरीक्षक अमोल दराडे, उरण आगारातील कर्मचारी महेश गोसावी, रामनाथ म्हात्रे व इतर कर्मचारी अधिकाऱ्यांचे कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रविंद्र चव्हाण यांनी आभार मानले आहेत.