MSRTC | गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार ४,३०० जादा एसटी बसेस!
रत्नागिरी : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रेल्वे बरोबरच राज्य मार्ग परिवहन महामंडळही सज्ज झाले आहे. दिनांक 2 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत एसटीच्या ४३०० बसेस सोडला जाणार आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवारी कोकण करिता 4300 ज्यादा बसेस सोडण्याचा यावेळी महामंडळाने निर्णय घेतला आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2024 पासून मुंबई, ठाणे, तसेच पालघर विभागातून कोकणातील विविध ठिकाणी ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात एसटी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एसटी बसस्थानके तसेच थांब्यांवर अहोरात्र कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्याचबरोबर महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात ठेवले जाईल. याचबरोबर यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गावर तात्पुरती प्रसाधनगृह उभारली जाणार आहेत.
-अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.
गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी एस.टी.कडून
कोकणात तीन हजार पाचशे बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यामध्ये 800 गाड्यांची भर पडले आहे.
ज्यादा गाड्यांचा आरक्षण एसटी महामंडळाच्या संकेतस्थळासह MSRTC BUS reservation या मोबाईल ॲप वर देखील उपलब्ध आहे.
हे देखील वाचा : MSRTC | गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार ४,३०० जादा एसटी बसेस!