MSRTC | रत्नागिरीचे अत्याधुनिक एस टी. बस स्थानक रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत

रत्नागिरी : रत्नागिरी येथे तब्बल साडे सतरा कोटी रुपये इतका निधी खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक एसटी बस स्थानकाचे लोकार्पण दि. 11 मे 2025 रोजी केले जाणार आहे.
नव्या बस स्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर जवळपास पाच ते सहा वर्षे रखडले होते. मात्र स्थानिक नवीन ठेकेदार कंपनी या कामासाठी नेमण्यात आल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षातच काम पूर्णत्वास गेले आहे. आता हे नवीन बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
रविवार दिनांक 11 मे रोजी रत्नागिरीतील या नव्या बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावरून बाहेरगावी जाणाऱ्या बसेस तर खालील मजल्यावरून शहरी बस चालवण्यात येणार आहेत. सुसज्ज आरक्षण कक्ष, प्रवाशांसाठी उपहारगृह, व्यापारी गाळे यांचा नव्या बस स्टँड इमारतीत समावेश आहे.