MSRTC | पाली एसटी बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा
रत्नागिरी : पाली बस स्थानकाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
उद्योग खात्याच्या मार्फत महाराष्ट्रातील विविध बस स्थानकांच्या विकासासाठी ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकाचं काम हे पहिल्यांदा MIDC च्या निधीमधूनच करण्याचा निर्णय आम्ही घेतला, अशी माहिती लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय यांनी दिली.
रत्नागिरीमध्ये पायाभूत सुविधांचे जाळं निर्माण करून हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा करण्याचं माझं स्वप्न आहे, त्यासाठी वाहतुकीच्या सुविधा आणि दळणवळणाची साधनं वाढली पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, असेही उद्योग मंत्री सामंत म्हणाले.
या लोकार्पणप्रसंगी गोकुळ दूधचे संचालक मुरलीधर जाधव, युवासेना कोरकमिटीचे सदस्य शिवाजी जाधव, शिवसेनेचे रत्नागिरी तालुकप्रमुख बाबू म्हाप यांसह अधिकारी व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येन नागरिक उपस्थितीत होते.