महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण
लांजा आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

लांजा : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र विभागमार्फत लांजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान मंदिराचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रणालीद्वारे उपराष्ट्रपती जगदीप धनखंड यांच्याहस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेची जनजागृती व्हावी यासाठी कौशल्य विकास विभागा मार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून संविधान मंदिराचे लोकार्पण झाले. या उद्धाटन कार्यक्रमाला आयटीआयचे महेंद्र गवई, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग व विध्यार्थी उपस्थित होते.