Mumbai-Goa highway | आरवलीतील सर्व्हिस रोडच्या दुसऱ्या बाजूचे काम अखेर प्रगतीपथावर

आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली येथील उड्डाण पुलाखालील दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरणाचे काम अखेर ठेकेदार कंपनीने वेगाने सुरू केले आहे. या ठिकाणच्या एका मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम याआधीच पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या बाजूचे काम रखडले होते. त्यातच मागील काही दिवसांपासून ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती.याचबरोबर आरवली येथील बाजारपेठेत उड्डाणपुलाखाली पावसामुळे प्रचंड चिखल झाल्यामुळे ठेकेदाराने तात्पुरती खडी टाकल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आता पाऊस कमी झाल्यामुळे दुसऱ्या लेनवरील काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. जोरदार पाऊस सुरू व्हायच्या आधी बाजारपेठेतील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले गेले नाही तर चिखलाचा सामना व वाहधारक तसेच नागरिकांना देखील करावा लागणर असल्याबाबत प्रसार माध्यमांमधून ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधण्यात आले होते. अखेर या कामाला ठेकेदार कंपनीने वेग दिल्यामुळे वाहनधारक तसेच ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.