ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्स
Mumbai-Goa highway | कशेडी घाटात हायड्रोजन गॅस सिलिंडर वाहक ट्रक कोसळला
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/Khed03-04-570x470.jpg)
- राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
पोलादपूर : मुंबई – गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई येथून खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये हायड्रोजन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला. या अपघात चालक जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात घडलेल्या या अपघातानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काय काय झाली. अपघातग्रस्त ट्रक मध्ये हायड्रोजन सिलिंडर भरलेले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घाटाला पर्यायी कशेडी बोगद्यातून वाहतूक वळवण्यात आली.