Mumbai-Goa highway | चिपळूणच्या उड्डाणपुलावर दुसऱ्यांदा दुर्घटना ; क्रेनचा दोरखंड तुटल्याने तीन कामगार कोसळून जखमी
चिपळूण : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणमधील बहादुर शेख नाका येथील काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरचा भाग तोडत असताना भल्या मोठ्या क्रेनचा दोरखंड अचानक तुटल्यामुळे तीन कामगार जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री दुर्घटना घडली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे उड्डाणपूल उभारला जात असतानाच काही महिन्यापूर्वी त्याचा भाग कोसळल्यामुळे आता हा उड्डाणपूल दिल्लीतून पाठवण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीने सुचवल्यानुसार सुधारित डिझाईन तयार करूनजात आहे. यासाठी जुने बांधकाम तोडले जात असताना जुन्या बांधकामांमधील पिलरचा काही भाग कटरने कापून क्रेनच्या सहाय्याने खाली आणल्या जात असताना अचानक क्रेनचा दोरखंड तुटला. यामुळे तीन कामगार अर्ध्यावरच लटकून पडले.
या दुर्घटनेत एक कामगार घटनास्थळी कोसळल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. दुर्घटनेत इतर दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अवघ्या काही महिन्यात चिपळूणच्या या एकाच उड्डाणपुलावर दुसऱ्यांदा दुर्घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.