Mumbai-Goa highway | लांजातील आंजणारी पुलावरून वाहतूक सुरू
लांजा : आंजणारी पुलावरील बंद करण्यात आलेली वाहतुक सायंकाळी सुरू झाली आहे. एसटी प्रवासी अडकले होते. रत्नागिरी सावंतवाडी बस पाली येथे थांबवली होती. रत्नागिरी खोरनिनको बस ही थांबविली होती. लांजा पाली मार्गे जाणाऱ्या एस्टी फेऱ्या पावस मार्गे वळवली होत्या.
लांजा तालुक्यातील नावेरी, मूचुकुंडी, काजळी नदीला आलेल्या पुराने काठावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे तर कोट, नादिवली येथे तीन घरांचे नुकसान झाले आहे. साटवली येथे गांगो वाडी येथे पुरचे पाणी शेतात घुसले आहे. विलवडे कुरंग मार्गावरील नावेरी नदीला पूर आल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे श्री.गणपत केशव नारकर रा. कोट यांच्या घरावर झाडाची फांदी कडून नुकसान झाले आहे. महेंद्र गोपाळ शितप नांदिवली यांच्या घराच्या भिंती मुसळधार पावसामुळे कोसळून नुकसान झालं आहे. आंजणारी पुल बंद झाल्याचे एसटी वाहतूक पावस मार्गे वळवली असल्याचे लांजा आगार व्यवस्थापक सौ काव्या पेडणेकर यांनी सांगितले रत्नागिरी, सावंतवाडी बस पाली स्थानकात थांबावली आहे.
काजळी नदीने इशारा प पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील आजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती मुलाच्या दुतर्फा बॅरॅकेट्स आणि पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.
आज दिवसभर मुसळधार पावसाने थैमान घातले असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे काजळी नदीने 18.50 ही इशारा पातळी गाठल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
नदीतील पाणी पातळी वाढल्यामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजता दरम्याने पाण्याची पातळी वाढू लागली जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.