Mumbai-Goa highway | लांजातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा सुरू
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/IMG-20240630-WA0014-780x470.jpg)
लांजा : लांजा शहरातील महामार्गाचे बंद ठेवण्यात आलेले काम शहर समन्वय समितीच्या आग्रहानुसार पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
दि. 4 जुलै रोजी समन्वय समितीच्या सदस्यांनी महामार्गाचे काम चालू ठेवण्यासंदर्भात माननीय तहसीलदार लांजा यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले होते. तहसीलदार यांची ते मुख्यालयाबाहेर असल्याने प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.
दि.05 पाच जुलै रोजी सकाळी तहसीलदार लांजा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समितीची भूमिका समजावून सांगण्यात आली तसेच कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांना निवेदनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सदस्यानी विनंती केली. त्यानुसार प्रशासनाने सदरच्या लांजा शहर समन्वय समितीच्या भूमिकेचा तातडीने योग्य तो विचार करून आज सायंकाळी 05 जुलै रोजी चार वाजता महामार्गाचे काम सुरू करण्याचे आदेश देऊन काम सुरू झाले आहे.
काल दुपारी समन्वय समितीच्या सदस्यानी तातडीने उपस्थित राहून बैठकीत निर्णय घेतल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे असे शहर समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले