Mumbai-Goa highway | लांजा एसटी बस स्थानकासमोरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश
लांजा : लांजा एसटी बस स्थानकासमोरील पडलेल्या खड्ड्यांचा विषय अखेर मार्गी लावण्याचे आदेश महामार्ग विभागाचे उपअभियंता यांनी महामार्ग ठेकेदार ईगल कंपनीला दिले आहेत.
लांजा एसटी बस स्थानकासमोर पडलेले खड्डे या संदर्भात प्रवाशांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. लांजा एसटी महामंडळाच्या अखत्यारितला विषय नसल्याने लांजा एसटी स्थानक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभाग यांच्या कोर्टात हा खड्डा रस्ता प्रश्न ठेवला होता. एस टी महामंडळाची रत्नागिरी विभागाची अभियंता मोहिते यांनी महामार्ग विभागाला या संदर्भात सूचित केले होते. आगार व्यवस्थापक सौ. काव्या पेडणेकर यांनी खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली होती. काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आज महामार्ग उपअभियंता श्री. राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क स्थानकसमोर पडलेले खड्डे यांचा प्रश्न बाबत लक्ष वेधून गेले. यावर श्री. कुलकर्णी यांनी ईगल कंपनीला रोड सर्व्हिस करताना यावर काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी लांजा एसटी स्थानकाचे 2600 स्क्वेअर फूट कॉंक्रिटीकरण 50 लाख रुपये खर्च करून करण्यात आले होते. परंतु एसटी स्थानकासमोर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.