ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

Mumbai-Goa Highway | लांजात महामार्गावर खड्ड्यांसह  चिखल माती ; आक्रमक नागरिकांचा उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा

लांजा : लांजा शहरांमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे, चिखलाचे साम्राज्य यामुळे आक्रमक झालेल्या लांजा शहरातील नागरिकांनी आज उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था, दुतर्फा साईडपट्ट्या करण्याचे आदेश ठेकेदार ईगल कंपनीला दिले आहेत. राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पाईपलाईन गटारे आणि साईडपट्ट्या यांना पर्यायी जागा देण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

पावसाळा सुरू झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने लांजा शहरात कोर्ले फाटा ते साटवली फाटा या दरम्यान रस्ता अतिशय चिखलमय आणि धोकादायक बनला आहे. गटारे आणि सर्व्हिस रोड नसल्याने रस्त्यावर चिखल साचून वाहतुकीला मोठा फटका बसला आहे असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कोर्ले फाटा येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठे खड्डे आणि चिखल झाला आहे.

लांजा शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्ट्यांचे  काम लवकरात लवकर पूर्ण होईल. पावसामुळे चिखल असल्याने अडथळा येत आहे. याबाबत ठेकेदार कंपनीला पर्यायी उपलब्ध करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.

वैशाली माने, उपविभागीय अधिकारी राजापूर.

या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी लाजा शहरातील ज्येष्ठ नागरिक श्री. बबन स्वामी, श्री. संजय बावधनकर, श्री. दाजी गडहिरे, शेखर धावणे, संदीप राड्ये, लांजा तालुका पत्रकार परिषद अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आणि साईडपट्ट्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला.

लांजा शहराची नागरिकांची गरज लक्षात घेऊन पत्रकार सिराज निवरेकर यांनी महामार्ग उपअभियंता श्री राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून लांजा शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली. यावर श्री. राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, लांजा शहरातील पाणीपाईप, लाईन गटारे आणि साईडपट्ट्या यांचे 80 टक्के काम झाले असून काही ठिकाणी जागेला विरोध झाल्याने त्या ठिकाणी गटारे आणि पाईपलाईन कामाला अडथळा आला आहे. महामार्गाच्या ठेकेदार कंपनीला सर्व्हिस रोड पूर्ण करण्याचे सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी माने यांनाही लांजातील जागेसंदर्भात होणारा अडथळा येणार नाही, असे सांगितले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button