‘OHE फेल्युअर’मुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीत व्यत्यय

रत्नागिरी,: कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी राजापूर दरम्यान आडवली रेल्वे स्थानकांनजीक ओव्हरहेड विद्युत वाहिनीत (OHE) बिधाड निर्माण झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुंबईतून गोव्याकडे धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस, कोचुवेली एक्सप्रेससह सावंतवाडी -दिवा एक्सप्रेसला फटका बसला. या गाड्यांमधील प्रवाशांचा खोळंबा झाला
सावंतवाडी येथून दिवव्याकडे जाणारी दैनंदिन एक्सप्रेस गाडी आडवली रेल्वे स्थानकात जवळ असता विद्युत वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने या गाडीसह याचवेळी या भागातून जाणाऱ्या गाड्या रोखून ठेवाव्या लागल्या. तासभरात खोळंबलेली वाहतूक सुरू होईल असे, कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणारी एक्सप्रेस गाडी या घटनेमुळे आडवली येथे थांबवून ठेवावी लागली. विद्युत वाहिनीतील बिघडल्यानंतर रत्नागिरी येथून तातडीने रेल्वेची ART (आपत्कालीन ) व्हॅन घटनास्थळी रवाना झाली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे सावंतवाडी दिवा एक्सप्रेसमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला.