शेतकऱ्यांवर दबाव आणून रिफायनरी लादली जाणार नाही : उद्योगमंत्री उदय सामंत
- काही लोक कपडे बदलतात तशी भूमिका बदलतात : उदय सामंत
- शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प आणणार : उदय सामंत
रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरीच्या वायफल चर्चेला उधाण आले असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी बाबत सुरु असलेल्या चर्चाना आज पूर्ण विराम देत म्हणाले शेतकऱ्यांवर कोणताही दबाव आणून राजापूर येथे रिफायरी प्रकल्प उभारला जाणार नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीमध्ये स्पष्ट केले.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर – बारसु, सोळगाव, गोवळ, शिवणे, देवाचे गोठणे,या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होणार होता. मात्र काही विरोधकांनी शेतकऱ्यांना काही वेगळ्या गोष्टी सांगून वातावरण भडकवण्याचे प्रयत्न सुरु होते. रिफायनरी विरोधात उलट सुलट चर्चा सुरु होती. मात्र काल रिफायनरी विरोधात काम करणाऱ्या संघटनांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांवर अन्याय आणि जबरदस्ती करून राजापूर वासियांवर रिफायनरी लादली जाणार नसल्याचे उद्योग मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी बाबत जी सुरवातीला भूमिका मांडली तीच भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राजकारणी कपडे बदलतात तशी आपली भूमिका बदलून शेकऱ्यांचा वापरत करत असल्याचे उद्योगमंत्री म्हणाले. रिफायनरी संघटनाना आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढचानिर्णय घेतला जाईल. त्या जागेत प्रदूषण विहरीत प्रकल्प आणण्यासाठी उद्योगमंत्री म्हणून मीं प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिफायनरी गावातील संघटनानी उद्योगमंत्री यांच्याशी प्रदूषण विहरीत प्रकल्पाचे स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.