महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजस्पोर्ट्स
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे तायक्वांदोपटूंचा गुणगौरव
रत्नागिरी : नगर परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित गुणगौरव कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात युवा मार्शल आर्ट तायकवाँडो ट्रेनिंग सेटर रत्नागिरी नाचणे साळवी स्टॉप येथे प्रशिक्षण घेणारे राज्य तायकवाँडो खेळाडू सार्थक भावेश गमरे तसेच साधना भावेश गमरे या दोन्ही खेळाडूंचा गुणगौरव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, प्रशांत सुर्वे, युवा जिल्हाप्रमुख केतन शेट्ये, युवा तालूकाप्रमुख तुषार साळवी, अभिजित दुडे, सौरभ मलुष्टे, पूजा पवार मनोज साळवी, दीपक पवार, सुनील शिवलकर, प्रिया साळवी,तुफेल पटेल आदी उपस्थित होते.