महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

Unreserved MEMU | पनवेल ते रत्नागिरी मार्गावर आजही धावणार मेमू लोकल ट्रेन

रत्नागिरी : कोकणात निवडणुका तसेच आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या  प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून या विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या गाड्या पूर्णपणे नारक्षित (Unreserved MEMU) असून प्रवाशांना जनरल श्रेणीचे तिकीट काढून प्रवास करता येईल.

१. सावंतवाडी रोड – पनवेल मेमू विशेष (MEMU Special)

​सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीची ठरेल.

  • गाडी क्रमांक: ०११५८
  • प्रस्थान (सावंतवाडी रोड): 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटली आहे.
  • आगमन (पनवेल): रात्री ८:१५ वा. (अंदाजे)
  • प्रमुख थांबे: कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर आणि रोहा.

२. पनवेल – रत्नागिरी मेमू विशेष (MEMU Special)

​पनवेलहून पुन्हा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष फेरी उपलब्ध असेल.

  • गाडी क्रमांक: ०११५७
  • प्रस्थान (पनवेल): १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २०:२५ वाजता रात्री ८ वाजून पंचवीस मिनिटांनी
  • आगमन (रत्नागिरी): दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता.
  • प्रमुख थांबे: आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

महत्वाची वैशिष्ट्ये:

  • डब्यांची रचना: ही गाडी ८ डब्यांच्या मेमू (MEMU) रॅकसह धावेल.
  • तिकीट: ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्याने आगाऊ आरक्षणाची (Reservation) गरज नाही.
  • फायदा: या गाडीमुळे नियमित धावणाऱ्या कोकण कन्या, तुतारी आणि मांडवी एक्सप्रेसवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button