Vande Bharat sleeper | वंदे भारत स्लीपर ट्रेन अखेर मुंबईत दाखल

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू असलेली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस प्रत्यक्ष मार्गावर धावण्यासाठी बुधवारी मुंबईत दाखल झाली आहे. प्रस्तावित मार्गावर काही चाचणी झाल्यानंतर स्लीपर श्रेणीतील वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रत्यक्ष प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.

हाय स्पीड वंदेभारत स्लीपर ट्रेन या उच्च वेगाच्या तसेच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज तसेच भारतीय बनावटीच्या ट्रेनची वेग चाचणी या आधीच यशस्वी झाली आहे. या चाचण्यांमुळे वंदे भारत (स्लीपर) गाड्या लवकरच रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसणार आहेत, असे सांगितले जात होते. अखेर मुंबईत ही गाडी दाखल देखील झाली आहे. या गाड्यांमध्ये आधुनिक सुविधा असून, प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवास अनुभव घेता येणार आहे.

नवीन वर्षात उच्च गती गाड्यांची भेट प्रवाशांना मिळणार आहे कोटा विभागात वंदे भारत (स्लीपर) गाड्यांच्या यशस्वी चाचण्यांमध्ये १८० किमी प्रति तासांचा उच्च वेग साध्य झाला आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या या नव्या श्रेणीतील गाड्यांमधून प्रवास अनुभवाचे स्वप्न साकार होणार आहे.

रेल्वे प्रवाशांना जगातील सर्वोत्तम प्रवास अनुभव मिळणार आहे.
याशिवाय, उच्च वेगामुळे प्रवास वेळ कमी होईल आणि प्रवाशांना वेळ आणि पैशाची बचत होईल. यामुळे देशातील रेल्वे प्रवासाची गुणवत्ता सुधारेल आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे