ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज

बचतगटांच्या माध्यमातून महाराष्ट्र टाळ्या वाजवेल असं काम करा : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि. २८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महिला भगिणी, तरुण आणि ज्येष्ठांचा विकास झाला तर तोच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास ही भावना ठेवून शासन काम करीत आहे. बचत गटाच्या माध्यमातून एवढं चांगले काम करा, सारा महाराष्ट्र तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल. बचतगटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवा, 20 कोटीचे भवन बांधण्याची माझी तयारी आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.


येथील आठवडा बाजारा मधील रत्नागिरी शहर महिला बचतगट विक्री केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, शिल्पाताई सुर्वे, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप, कांचनताई नार्वेकर, माजी नगरसेविका शीतल पावसकर, माजी नगरसेवक रोशन फाळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय चांगली बाजारपेठ बचतगटांच्या उत्पादनांना मिळू शकते. तो शब्द आज भूमिपूजनाने पूर्ण करीत आहे. या भवनामध्ये 400 महिलांना प्रशिक्षण दिले जाईल, असा सभागृह असणार आहे. सीआरपींचे मानधन 6 हजार केले आहे, हा शब्द पूर्ण केला आहे. 30 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2 हजार 443 महिलांना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील पहिलं बचत गटांचे विक्री केंद्र रत्नागिरीत होत आहे, याचा मला अभिमान आहे. त्यासाठी 9 कोटी 3 लाख रुपये महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत.
जे जे आश्वासन दिले, ते ते प्रमाणिकपणे पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुढच्या महिन्यात 500 महिलांना केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. त्यांनतर पथदर्शी प्रकल्प रत्नागिरीत सुरु करुन क्वायर बोर्डाचे कार्यालय सुरु करण्यात येईल. जिल्हयातील पहिले 5 बचतगट पुढच्या वर्षी दिल्लीच्या दालनात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात नेण्याची जबाबदारी माझी असेल. अजूनही काही वेगळ करुन देता येईल का, याबाबतही माझा प्रयत्न सुरु आहे, असेही ते म्हणाले.


यावेळी माविमतर्फे प्रातिनिधिक स्वरुपात बचत गटांना धनादेश देण्यात आले. त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हवळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले तर माविमचे जिल्हा समन्वयक अंबरिश मिस्त्री यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button