क्राईम कॉर्नरमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

अखेर परप्रांतीयांच्या विरोधात शिरोडकर कुटुंबियांची तक्रार शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पोलिसांत दाखल

  • माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये धडक
  • न्याय मिळेपर्यंत शिवसेना शिरोडकर कुटुंबियांच्या पाठीश

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांच्या जमीनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरातच्या अहमदाबाद येथील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीने परप्रांतीय महिलांना पाचारण करून दिव्या शिरोडकर, संजना शिरोडकर, चंद्रभागा शिरोडकर, सायली शिरोडकर या महिलांना मारहाण करण्यास लावली. हि मारहाण होऊन पाच दिवस उलटले, मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले, स्थानिक वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले आणि याबाबतची तक्रार शिरोडकर कुटुंबियांनी देऊनही वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तक्रार नोंद केली नाही. त्यामुळे अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये धडक देत पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना याचा जाब विचारला. तसेच शिरोडकर कुटुंबिय महिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेत पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना तक्रार नोंद करून घेण्यास भाग पाडले. त्यानुसार पाच दिवसांनी आज या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यावेळी संजना शिरोडकर,दिव्या शिरोडकर म्हणाल्या गुजरात मधील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर व श्रीपाद विलास महाजन हे आमच्या जमिनीमध्ये घुसून जबरदस्तीने आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.आम्हाला धमक्या देत आहेत.आणि आम्हाला परप्रांतीय महिलांकडून मारहाण सुद्धा करण्यात आली.आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे विनवणी त्यांनी केली आहे.

महायुती सरकारच्या काळात सर्वच ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. गुजराती लोक जमिनीसाठी स्थानिकांना मारहाण करीत असतील जमीन हडप करीत असतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नसतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुजरातचे प्रशासन आहे का सवाल वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. दाभोली येथील शिरोडकर कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना पाठीशी राहणार असल्याचे असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, संजय गावडे, शहर प्रमुख अजित राऊळ,युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नरसेवक तुषार सापळे, दाभोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, विवेक परब,अमित राणे, शैलेश परुळेकर,गजानन गोलतकर, संतोष शिरोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button