रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून म्हणून सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये व उच्च माध्यमिक शाळा यांना दिनांक 20 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्यामार्फत ही सूचना बुधवारी रात्रीच विद्यार्थी तसेच पालकांपर्यंत सोशल मीडिया द्वारे कळविली आहे