आरवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी समूदाय आरोग्य शिबिर

- १५५ गरजूंनी घेतला शिबिराचा लाभ
आरवली : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरवली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी 04 सप्टेंबर 2025 रोजी डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. माखजन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उत्कर्ष तरुण मित्र मंडळ आरवली यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण १५५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
या शिबिरात नागरिकांची रक्तदाब (प्रेशर), साखर (शुगर) आणि रक्त तपासणी करण्यात आली. तसेच, शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान कार्ड योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कार्ड काढून देण्यात आले. याव्यतिरिक्त, किरकोळ आजारांवर तातडीने उपचार आणि अधिक तपासणीसाठी संदर्भ सेवा (रेफरल सेवा) देखील पुरवण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश चाटे, नरहरी चाटे, सागर मुसळे आणि सुनील तिकोटी यांचा सहभाग होता.

आरोग्य सेविका आंबवकर आणि शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्व आशा सेविका, लॅब टेक्निशियन प्रियांका बने आणि स्थानिक महिला बचतगट आरवली यांनीही या शिबिरासाठी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शिबिर यशस्वी होऊ शकले आणि अनेक गरजू नागरिकांना याचा थेट फायदा झाला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश दाजी परकर, मंदार संदीप पिलणकर, अशोक केंडविलकर, जिग्नेश हिंमतलाल पटेल, चैतन्य मनोज परकर, संजय शांताराम जाधव, विनायक राजाराम सुर्वे, संतोष चारुदत्त पेडणेकर, दत्तात्रय दाजी परकर, विक्रम संतोष परकर, सुदेश मारूती पवार, भरत दाजी भुवड, सुजल संदीप पिलणकर, मंगेश दानी परकर यांनी प्रयत्न केले.