उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी उद्या दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत 17 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकनेते शामराव पेजे त्यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माळ नाका येथील पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत.
ना. सामंत यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ५.०० वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. पहाटे ५.२० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन. (स्थळ : माळनाका, रत्नागिरी). सकाळी ११.०० वाजता लोकनेते शामराव पेजे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी (नवीन इमारत). दुपारी १२ वाजता पाणी टंचाई आढावा बैठक (स्थळ : स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, जि.प., रत्नागिरी) दुपारी १.०० ते ३.०० वाजता भेटीसाठी राखीव. (स्थळ : संपर्क कार्यालय, जयस्तंभ, रत्नागिरी). दुपारी ४.०० वाजता आकाशवाणी मुलाखत कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : आकाशवाणी केंद्र, रत्नागिरी, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी). रात्री ९.३० वाजता श्रमिक किसान सेवा समिती, रत्नागिरी संचलित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल, श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान, कनिष्ठ व वरिष्ठ विद्यालय, शिवार आंबेरे “झेप युवा महोत्सव” (स्थळ : शिवार आंबेरे विद्यानगरी, ता.जि. रत्नागिरी) रात्रौ ११.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कॉकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०११२) मुंबई कडे प्रयाण.