उरण नगरपरिषदेमध्ये तिरंगी लढत

- शिवसेनेमुळे होत आहे चुरशीचा सामना
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी तर निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी आहे. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ४ तर २१ नगरसेवक पदासाठी ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. निवडणूक जवळ आल्याने प्रचारात आता रंगत आली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीचे शोभा कोळी शाह, महाविकास आघाडी तर्फे भावनाताई घाणेकर, शिवसेना महायुती तर्फे रुपाली ठाकूर तर अपक्ष म्हणून शेख इसरार असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
भाजप महायुतीने एक नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत.महाविकास आघाडीने सुद्धा एक नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत तर शिवसेना महायुतीने एक नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ४ उमेदवार उभे केले असून उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार केला आहे. उरणमध्ये निवडणुका जवळ आल्याने उरणमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे हे चित्र आता स्पष्ट झाले आहेत
खरी लढत ही भाजप महायुती,शिवसेना महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच आहे. खरी लढत या तीनच आघाडीमध्ये होणार आहे. शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक आता चूरशीची झाली आहे. शिवसेनेचे उरण मध्ये काहीही ताकद नाही असे म्हणणाऱ्यांना यावेळी शिवसेना महायुतीचे उमेदवार हे समोर उभे असलेल्या उमेदवारांना योग्य तो धडा शिकवणार आहेत. शिवसेना महायुतीचे उमेदवारमुळे उरण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. उरण नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे मते निर्णायक आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा संदेशच शिवसेना महायुतीने आपले उमेदवार उभे करून विरोधकांना दिला आहे.शिवसेना महायुतीने देखील प्रचारात आघाडी घेतली असून विजय आमचाच असेल असे मत जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी व्यक्त केले आहे.





