उरण महाविद्यालयात दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिर

उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इंदिरा गांधी रुग्णालय उरण यांच्या सहकार्याने दंत व मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन.गायकवाड यांनी दाताचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी दाताची काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. डॉ संतोष झापकर (दंतशल्य चिकित्सक, इंदिरा गांधी रुग्णालय उरण) यांनी दात घासण्याच्या पद्धती, तसेच दंत व मौखिक आरोग्य याची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व एकूण 62 विद्यार्थ्यांची दंत व मौखिक तपासणी करण्यात आले. तसेच त्यांचे योग्य समुपदेशन केले.
यावेळी श्रीमती हिरा ठोंबरा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय योजना प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमात आय.क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, डॉ.पराग कारुलकर, प्रा. व्हि. एस. इंदुलकर, डॉ. एच.के जगताप, प्रा. आनंद गायकवाड,डॉ. एम. जी. लोने, प्रा.रियाज पठाण,प्रा.विनिता तांडेल, प्रा.कु.हन्नत शेख आदी उपस्थित होते.