उर्मी ग्रुप रत्नागिरीतर्फे सुमेधाताई चिथडे याचे आज व्याख्यान
रत्नागिरी : स्वतःचे दागिने विकून सुरवात करून सियाचीन येथे आपल्या देशबांधवांसाठी ऑक्सिजन प्लॅन्टच्या निर्मितीचा ध्यास घेऊन, त्यासाठी नेटाने प्रयत्न करून ते काम पूर्णत्वास नेणार एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सुमेधाताई चिथडे. त्यांचे अनुभव, त्यांच्याचकडून ऐकण्याची संधी रत्नागिरीवासियांना उपलब्ध जाली आहे.
उर्मी ग्रुप रत्नागिरी मार्फत दि. दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सुमेधाताई चिथडे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान हे रंजन मंदिर सभागृह, शिर्के हायस्कूल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
सर्व देशप्रेमी नागरिकांनी यासाठी आवर्जून उपस्थित राहवे, असे आवाहन उर्मी ग्रुपमार्फत करण्यात आले आहे.हे व्याख्यान सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे ,परंतु स्वेच्छेने चिथडे यांनी या कामासाठी स्थापन केलेल्या सिर्फ SIRF foundation ला gpay अथवा चेकद्वारे कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिक मदत करू शकतात.