ओवी काळे ठरली रत्नागिरीची ‘सुवर्णकन्या’!

- चार सुवर्ण, दोन रौप्य पदकांसह एका कास्य पदकावरही कोरले नाव!
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने शहनुर चिपळूण तालुका तायक्वांडो अकॅडमी यांच्या वतीने 27 वी खुल्या तायक्वांडो फाईट व पुमसे जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा २०२४ पुष्कर स्वामी मंगल सभागृह बहादूर शेख नाका चिपळूण येथे दि. ६ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत जिल्हाभरातून चारशे ते साडे चारशे खेळाडू सहभाग झाले होते.
स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे साळवी स्टॉप, मालगुंड गणपतीपुळे कुवर्बाव , टीआरपी , खेडशी शाखेतील एकूण खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातील
युवा मार्शल आर्ट क्लब रत्नागिरी या साळवी स्टॉप नाचणे शाखेत प्रशिक्षण घेणारी रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. विद्यालयात शिक्षण घेणारी सुवर्णकन्या ओवी संतोष काळे हिने ४ सुवर्ण २ रौप्य १ कास्य पदकाची कमाई केली. हे यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.ओवी हिला युवा मार्शल आर्ट तायक्वांडोचे प्रमुख प्रशिक्षक राम कररा याचे मार्गदर्शन लाभले.