कोकण रेल्वे मार्गावर उद्या अडीच तासांचा ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वे मार्फत देखभाल दुरुस्तीची कामे उरकरण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी देखील सावंतवाडीनजीक नजीक मडुरे ते मजोरडा विभागात अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांपासून 11:55 पर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या गाड्या थांबवून ठेवणार
१) गाडी क्रमांक 16 345 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी डाऊन नेत्रावती एक्सप्रेस चार डिसेंबरला रत्नागिरी ते सावंतवाडी स्थानकादरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे.
२) कोकण रेल्वे मार्गे धावणारी 12619 ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल दरम्यान धावणारी 4 डिसेंबरची मत्स्यगंधा एक्सप्रेस रत्नागिरी ते कुडाळ स्थानकादरम्यान अर्ध्या तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.
एका गाडीचे पुनर्नियोजन
१) मेगा ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 17 310 ही वास्को-द-गामा ते यशवंतपूर दरम्यान धावणारी 4 डिसेंबर रोजीची एक्सप्रेस गाडी वास्को-द-गामा येथून अर्धा तास उशिरा सोडण्यात येणार आहे.