ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी

कोकण रेल्वेची नवीन मेमू ट्रेन पाहिलीत?

रोहा स्थानकावर पाहायला मिळाली पहिली झलक !

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर सध्या धावत असलेल्या पॅसेंजर गाडीला मेमू ट्रेनमध्ये बदलण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. आयसीएफ चेन्नई येथील कारखान्यातून कोकण रेल्वेकरिता तयार करण्यात आलेल्या मेमू गाडीची झलक ‘रत्नागिरी लाईव्ह’ने आपल्या देश-विदेशातील कोकण रेल्वेप्रेमी वाचकांसाठी प्रथमच उपलब्ध करून दिली आहे.

या संदर्भात आधी मिळालेल्या माहितीनुसार सध्या दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणाऱ्या एल एच बी श्रेणीतील पॅसेंजर गाडीची जागा ही नवी मेमू ट्रेन घेणार आहे. त्यासाठीचे नवे-कोरे मेमूचे रेक मार्गावर धावण्यासाठी दाखल देखील झाले आहेत. मात्र, ही गाडी दिवा-रत्नागिरी मार्गावरच धावते की, कोकणवासीयांच्या मागील काही वर्षांपासूनच्या मागणीनुसार मुंबईतील पश्चिम उपनगरातून (वसई रोडमार्गे ) कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाते, याचा अंतिम निर्णय रेल्वेने अजून जाहीर केलेला नाही.

रेल्वेच्या कारखान्यातून कोकण रेल्वेसाठी बनवून आलेली आणि मार्गावर प्रत्यक्ष धावण्यासाठी सज्ज झालेली मेमू गाडी कोकण रेल्वे मार्गावर नेमकी कधी धावते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

नवीन मेमू गाडी मार्गावर प्रत्यक्ष धावण्यापूर्वी सर्वसाधारणपणे गाडीची चाचणी घेतली जाते. यानुसार दोनच दिवसांपूर्वी या किंवा अशाच कारणासाठी कोकण रेल्वेची नवी कोरी मेमू ट्रेन रोहा स्थानकावर उभी असलेली पाहायला मिळाली. त्याआधी ही गाडी मडगाव येथे असल्याचे रेलप्रेमींकडून सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेची ही नवी मेमू ट्रेन मार्गावर प्रत्यक्ष धावेल, अशी शक्यता आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button