कोलकातामधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ देवरुखात निषेध रॅली
देवरूख (सुरेश सप्रे) : इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,साडवली व संगमेश्वर तालुका डॉक्टर असोसिएशन, आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्य निषेधार्थ देवरूखात काढण्यात आलेला रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीची सुरवात सकाळी ८.३० वाजता सावरकर चौक देवरुख येथून सुरुवात होत बस स्टॅन्ड ते माणिक चौक तिथून शिवाजी चौक. ते देवरूख पोलिस स्टेशन येथे समाप्त करण्यात आली.
देवरुख बस स्टॅन्ड आणि शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी फार्मसी महाविद्यालयाच्या कु. स्वाती गुरव आणि कु. वैष्णवी खांचने या विद्यार्थ्यांच्या टीमने अतिशय लक्ष वेधक पथनाट्य सादर केले. या रॅली द्वारे आणि पथनाट्याद्वारे समाजात होत असणारे स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी कसे पुढे येणे गरजेचे आहे यावरती प्रबोधन करण्यात आले.
संगमेश्वर तालुका डॉक्टर असोसिएशन मधून डॉ. भालेकर, डॉ. सौ. इशिता भालेकर, डॉ. सौ. फास्के, डॉ. सौ.प्राजक्ता कुलकर्णी, डॉ. विशाल आंबेकर, केमिस्ट्री आणि ड्रगिस्ट असोसिएशन कडून मुबीन माडगूळकर. मयूर खरात, फार्मसी महाविद्याल, मीनाताई ठाकरे महाविद्यालय. जूनियर सायन्स कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या रॅलीत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदर रॅलीस आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महिला अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या डॉ. महिलेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रद्युम्न माने यांनी यावेळी समाजात होत असणाऱ्या अशा प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल आणि जागरूकता रॅली आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि मान्यवर यांचे विशेष आभार मानले. ही रॅली शांततेत पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. वैष्णवी नलावडे आणि प्रा. स्वप्निल नेटके यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.