गणेशोत्सव काळात लांजा तालुक्यातील रेल्वे स्थानकांपर्यंत बस बसेस सोडव्यात
लांजा : गणेशोत्सव काळात लांजा तालुक्यातील रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांसाठी रेल्वे फेऱ्यांच्या वेळी लांजा आगारातून एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी लांजा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे यांनी प्रवासी राजा दिन या एसटी महामंडळ उपक्रमअंतर्गत आयोजित कार्यक्रमात मागणी केली आहे.
लांजा येथील आयोजित प्रवासी राजा या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद लाभला. लांजा आगारातील विविध समस्यांबाबत विभागीय नियंत्रक यांनी लांजा येथे बैठक आयोजित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एसटी महामंडळाच्या सेवांबाबत प्रवासांच्या असणाऱ्या तक्रारी यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात प्रवासी राजा दिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. शुक्रवारी लांजा आगारात हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रवास संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, दत्ता कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक श्री सुभाष मालप, सुधाकर कांबळे, श्री राणे, आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर, एसटी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रवासांमध्ये साठवली चे आंबोळकर उपस्थित होते
लांजा आगारातील जुन्या झालेल्या बसेस लांजा तालुक्यात धावत आहेत जुन्या गाड्या असल्याने नादुरुस्तीचे प्रमाण वाढत आहे. लांजा आगराला नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली झर्ये मुंबई, भांबेड मुंबई, इसवली मुंबई मुंबई मार्गावर एसटी बसेस वाढवण्याची मागणी करण्यात आली. लांजा एसटी स्थानकातील काँक्रीटकरणानंतर प्रवेशद्वारावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजवण्याचे मागणी या कार्यक्रमावेळी करण्यात आली.
गणपती उत्सव काळात मुंबईतून ट्रेनमधून येणारे प्रवासी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांना घरी पोहोचण्यासाठी खासगी वाहनाने जाण्यास दुप्पट भाडे द्यावे लागते. चाकरमान्यांचा होणारा मनस्ताप टाळण्यासाठी आडवली, विलवडे या रेल्वे स्टेशनवर नियोजित रेल्वे फेऱ्यांच्या वेळी एसटी उपलब्ध करण्याची मागणी हेगिष्टे यांनी प्रामुख्याने मांडली. एसटी प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.