गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयात ‘कृषी पर्यटन : समृद्ध शेतीचा राजमार्ग’ विषयावर सेमिनार
सावर्डे : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय,मांडकी-पालवण मध्ये दि. २०/०८/२०२४ रोजी कृषी पर्यटन समृद्ध शेतीचा राजमार्ग या विषयावर सेमिनार घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.निखिल चोरगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व एग्रीकल्चर टुरिझम अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन चे अध्यक्ष मा.श्री पांडुरंग तावरे यांची सर्वांना ओळख करून दिली. मा.श्री. पांडुरंग तावरे यांनी विद्यार्थ्यांना कृषी पर्यटन व कृषी पर्यटनातील संधी यावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी फक्त शेतीमालाच्या उत्पादनावर विसंबून न राहता आपल्या शेतीचा पर्यटनासाठी कसा वापर करता येईल व आपल्या शेतातून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत.तसेच कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या वेळेस मा.श्री.पांडुरंग तावरे व त्यांच्या सहचारिणी मा.सौ.वैशालीताई तावरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी त्यांचे सहकारी अरूण सूर्यवंशी,अरूण उपस्थित होते.यावेळी गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बी. बी. सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.