ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे कोतवडे ग्रामदेवता मंदिराजवळील बिअरशॉपीची अनुमती जिल्हाधिकार्यांनी नाकारली

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ आणि भाविक यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळील ‘ऋषिकेश बीअर शॉपी’ ची अनुमती जिल्हाधिकार्यांनी नाकारली आहे. या विरोधात गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ असलेल्या बीअरशॉपीला अनुमती नाकारावी, यासाठी जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार उदय सामंत, यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केली होती.
कोतवडे गावातील विविध वाड्यांमधील ग्रामस्थांनी स्वाक्षरीची मोहीम राबवून बीअरशॉपीच्या विरोधात कोतवडे ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. ग्रामस्थांनी एकजुटीने दिलेल्या या लढ्याला यश मिळाले असून जिल्हाधिकार्यांनी

वर्ष २०२२-२३ साठी बीअरशॉपीचे नूतनीकरण नाकारले आहे, तसेच मंदिराच्या जवळून बीअरशॉपी हटवण्याचा आदेश दिला आहे.
दि.३ फेबु्रवारी या दिवशी जिल्हाधिकार्यांनी कोतवडे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून निर्णयाची माहिती दिली आहे.