जि. प. शाळांना अतिवृष्टीमुळे दिलेली सुट्टी आज भरून काढणार!

वेळेबाबत मात्र शाळांमध्ये संभ्रम
रत्नागिरी : शिक्षण सप्ताह आणि अतिवृष्टीनिमित्त दिलेली सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी दि. २८ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा भरणार आहेत. मात्र, याबाबतचे परिपत्रकावरून शाळेच्या वेळांवरून शिक्षण वर्तुळात संभ्रावस्था निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रथमेश शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण साप्ताहची अंमलबजावणी करण्यात येत आहे दिनांक 26 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली असल्याने दिनांक 26 जुलै चा शालेय सप्ताह उपक्रम न झाल्याने या दिवसाचा उपक्रम आणि रविवारचा उपक्रम हे दोन उपक्रम मिळून रविवारी शाळा भरण्यात यावी. हा अतिवृष्टीमुळे मिळालेल्या सुट्टीतील दिवसांपैकी एक दिवस दिनांक 28 जुलै रोजी शिक्षण सप्ताह या उपक्रमाचे आयोजन करून तो दिवस भरून काढण्यात यावा अशा आशयाचे दिनांक 26 जुलै रोजी चे गटशिक्षणाधिकारी यांना पत्र आहे परंतु या पत्रात रविवारी कोणत्या वेळेत शाळा भराव्यात याचे स्पष्टीकरण नसल्याने शाळा व्यवस्थापन संभ्रमात पडले आहे. काही शाळांनी दहा ते दोन तर काही शाळांनी सकाळी 9 ते 5 असशी शाळा वेळ ठरवल्याचे समजते.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे ४ दिवस शाळा बंद राहिल्या आहेत. ८ जुलै, ९ जुलै, १५ जुलै व २६ जुलै असे ४ दिवस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अतिवृष्टीमुळे खबरदारीसाठी विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शाळा बंद होत्या तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढणेही क्रमप्राप्त आहे.
या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सदर दिवस भरुन काढण्यासाठी पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. मात्र, पत्रात वेळेचा उल्लेख नसल्याने जिल्हाभरात शाळा संभ्रमावस्था आहे. जिल्हा परिषद शाळांनी वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत. अतिवृष्टीची सुट्टी पूर्ण दिवस घेतली गेली. पण पत्रातील वेळेचा उल्लेख नसल्याने सर्वत्र गोंधळ आहे.