जिल्ह्यात जुडो, कराटे, वुशो, तायक्वांदो, बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन
- शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ, एस पी एफ महाराष्ट्रमार्फत आयोजन
- असोसिएशन्स, स्पर्धक, शाळा, क्रीडा मंडळे यांना सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेळाडूंना शासन मान्यताप्राप्त एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन वमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्याकडून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ ही 1974 मधील रजिस्टर संघटना असून एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन हे खेलो इंडिया, फिट इंडिया, आयुष मंत्रालय, स्किल इंडिया यासह युनो रजिस्टर फाउंडेशन आहे. असेच फाउंडेशनचा 22 देशांशी क्रीडा स्पर्धांसाठी करार देखील करण्यात येणार आहे. राज्यभरात फाउंडेशन व महामंडळ यांच्यामार्फत अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यात दि. 27, 28, 29 रोजी सर्व तालुक्यात तालुकास्तरीय तर दि. ३० व ३१ ऑगस्ट रोजी देवरुख व रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये कराटे, बॉक्सिंग ,तायक्वांदो , वुशो , ज्युदो आदी खेळांचे कौशल्य दाखविण्याची संधी जिल्ह्यातील खेळाडूंना प्राप्त होणार आहे. तालुका व जिल्हास्तरावरून निवड झाल्यानंतर त्यांना राज्यस्तरीय तसेच देशपातळीवर खेळण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सचिव श्रीकांत साहेबराव पाटील यांनी प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
ई. एस. पी. एफ. एम. हे राज्यातील एकमेव फाउंडेशन असून ज्यामधून तब्बल 33 शालेय ते आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त खेळ खेळण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक असोसिएशन्स, शाळा ,पालक , शिक्षक ,शाळा यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बीपीन मोहिते +919422635164 सहसचिव महेंद्र पवार +919420447327 तसेच ई एस पी एफ एम जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव 70589 807 59 सचिव करूणा कांबळी 8767106338 किंवा 912352357359 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व क्रीडा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष हे फाउंडेशनचे त्या क्रीडा प्रकाराचे जिल्हाप्रमुख असणार आहेत, अशी माहिती देखील या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन मुळे जिल्ह्यातील खेळाडूंना ज्याप्रमाणे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळातील कौशल्य दाखविता येणार आहे. त्याचप्रमाणे स्किल इंडिया कडून करण्यात आलेले विविध कौशल्य आधारित कोर्सेस देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील युवा पिढीला देखील शिक्षणाची नवी संधी फाउंडेशन कडून प्राप्त होणार आहे. या सर्व संधींचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष ई एस पी एफ महाराष्ट्र यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे देखील पहा :