महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
डिंगणीचे सुधीर चाळके यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड
देवरूख : रत्नागिरीचे आमदार व जिलह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार डिंगणी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधिर प्रदीप चाळके (डिंगणी ) यांची विशेष कार्यकारी अधिकारी ( S.E.O.) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2002 साली माजी सैनिकांच्या कोट्यातून त्यांचे वडील सुभेदार प्रदीप चाळके यांची sco म्हणुन नियुक्ती झाली होती. त्याच्या निवडीबद्दल शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार व खाडी विभाग प्रमुख महेश देसाई संघटक पपू गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
डिंगणी गावातील युवा कार्यकर्त्याची नेमणूक केलेबद्दल डिंगणीचे तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खाडे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.