महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
तुरंबव येथे मृदागंध ग्रुपतर्फे मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचा उपक्रम
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील भूमिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावामधील शाळेमध्ये मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती केली.
या प्रसंगी डॉ.रुपाली गाडेकर .तसेच आशा स्वयंसेविका सौ. प्रतीक्षा सावंत उपस्थित होत्या. या भूमिकन्या 21 जून रोजी गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत दाखल झाल्या आहेत.
या विद्यार्थीनी जून ते सप्टेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहितीची देवाण घेवाण करणार आहेत. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेल्या नवनवीन जाती, विकसित तंत्रज्ञान जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत तुरंबव येथे भेट दिली.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!