ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

दरड कोसळून बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात कोकण रेल्वेच्या वेरवली ते आडवली रेल्वे स्थानकानजीक मार्गावर दरड कोसळून विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाली.

कोकण रेल्वे मार्गावर वेरवली ते आडवली स्थानकाच्या दरम्यान मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या  सुमारास ही घटना घडली होती. यामुळे मुंबईकडे जाणारी जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेससह अन्य काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.


या दुर्घटनेनंतर कोकण रेल्वेचे आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाली होती.  रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड रुळावरून बाजूला केल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button