ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजस्पोर्ट्सहेल्थ कॉर्नर

दापोलीत १४ जानेवारीला तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन


१० ते १३ जानेवारी सायकल चित्रपट महोत्सव

दापोली : सायकल संस्कृती जपली जावी, यासाठी दरवर्षी सायकलप्रेमी एकत्र येऊन रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन आयोजित करतात. आतापर्यंत खेड आणि रत्नागिरी येथे सायकल संमेलन झाले असून पुढील तिसरे सायकल संमेलन दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज हॉल, दापोली येथे १४ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यामध्ये १० ते १३ जानेवारी सायकल चित्रपट महोत्सव असणार आहे.

दापोली सायकलिंग क्लब आयोजित या सायकल संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील, राज्य आणि देश विदेशातील अनेक सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. पाच दिवस सायकल विषयक भरगच्च माहितीपूर्ण कार्यक्रम असणाऱ्या या संमेलनाची प्राथमिक रुपरेषा पुढीलप्रमाणे असेल. १० ते १३ जानेवारी रोज सायंकाळी ५ ते ८ सायकल चित्रपट महोत्सव असेल. यामध्ये सायकल विषयक चित्रपट, व्हिडिओ, डॉक्युमेंटरी दाखवण्यात येतील, ३०-४० वर्षांपूर्वी सायकल मोहिमा केलेल्या काही सायकलप्रेमींचे अनुभव कथन असतील. १३ जानेवारी रोजी सायकलची ओळख, खरेदी, दुरुस्ती, लांब पल्याचे सायकलिंग, तयारी याबद्दल मार्गदर्शन सेशन, डेमो होतील.

१४ जानेवारी हा संमेलनाचा मुख्य दिवस असून यादिवशी सकाळी ७:३० वाजता दापोली परिसरात सायकल दिंडी असेल. ९ वाजता सायकल संमेलनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले महाराष्ट्रीय आणि दापोलीकर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांच्या हस्ते होईल. पूर्ण दिवस अनेक सादरीकरण, चर्चासत्र, अनुभव कथन इत्यादी असेल. यामध्ये कॅन्सरवर मात करत आयर्नमॅन बनलेले डॉ तेजानंद गणपत्ये, हाल्फ आयर्नमॅन मिलिंद खानविलकर, डेक्कन क्लीफहँगर फिनिशर रुपेश तेली, सायकलने नर्मदा नदी परिक्रमा केलेले संजय सावंत, आजारावर मात करत SR बनलेले मृत्युंजय खातू, रॉकेटमॅन अहमदअली शेख, एका वर्षात ३ SR केलेले अमित कवितके, १००० किमी BRM पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली महिला डॉ मनिषा वाघमारे, ७५ तासात १००० किमी करणारे प्रशांत दाभोळकर, रोहन पवार, सह्याद्री रँडॉर्निअरचे अनंत भाटवडेकर, श्रीनिवास गोखले, निलेश कुष्टे, डॉ रामदास महाजन, जगातील सर्वात उंच घाटरस्ता उमलिंगला पास सायकलने सर करणारे यश म्हसकर, संपूर्ण महाराष्ट्र सायकलने भटकंती करत ३६५ दिवसात ३७० किल्ले सर करणारा मावळा सुबोध गांगुर्डे, ८५ दिवसात ६००० किमी सायकल प्रवास करत १२ ज्योतिर्लिंग यात्रा करणारी पूजा बुधवले, कोटेश्वर ते किबीतु, सियाचीन ते कन्याकुमारी, नेपाळ, श्री लंका सायकल मोहीम केलेले डॉ रामेश्वर भगत, हवामान बदलाच्या जागृतीसाठी रस्त्याने जगपरिक्रमा केलेले पहिले भारतीय हिंदयानचे विंष्णुदास चापके, GRM सुरु करणारे गोपाल साबे पाटील, अंधत्वावर मात करत सायकलिंग करणारे सागर बोडके, मुंबई परिसरातील धनंजय मदन, सुधिर चकोले, प्रज्ञा म्हात्रे, राम जोशी, कुणाल सुतार इत्यादी अनेक नावाजलेले सायकलस्वार सहभागी होणार आहेत.

१४ जानेवारीसाठी प्रवेश शुल्क ₹ ३०० (विद्यार्थ्यांसाठी ₹ १५०) असून यामध्ये चहा नाश्ता, जेवण समाविष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्याबाहेरुन सायकल चालवत येणाऱ्या सायकलिस्टसाठी प्रवेश विनामूल्य असेल. संमेलनसाठी नोंदणी आवश्यक आहे, नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/K7g1Ec6A4fSL28i29 आहे. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर अंबरीश गुरव ८६५५८७४४८६, प्रशांत पालवणकर ८७६७२८५८२७, सुरज शेठ ८३०८३६६३६६, विनायक वैद्य ९९६००९६४३५ हे आहेत. हे सायकल संमेलन पुन्हा सायकलिंग सुरु करण्यासाठी आणि आरोग्यदायी तंदुरुस्त तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button